नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी आज सोने दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर कमी झाला. तर चांदी चांदीच्या किमतीत (Silver Rate Today) वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा वायदे भाव 27 रुपयांनी कमी होऊन 51,420 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
सोने दरात मागील काही दिवसांपासून 3500 रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. MCX वर सकाळी चांदीचा वायदे भाव 174 रुपयांनी वाढून 68,050 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला. मागील आठवड्यात चांदीचा भाव अनेक दिवसांनंतर 68 हजारहून खाली आला होता. परंतु आता पुन्हा तो 68000 वर पोहोचला आहे.
सोने दरात वाढू होऊ शकते
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूडच्या दरात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय उर्जा एजेन्सीने (IEA) पुढील महिन्यापासून रशियातून 30 लाख बॅरल तेल बाजारात येणं बंद होईल. या घोषणेनंतर क्रूड किमतीत 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. क्रूड ऑइल महाग झाल्याने पुन्हा एकदा सोन्याची मागणी वाढेल आणि सोने दरात वाढू होऊ शकते. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध निवळलं असताना सोने दरात घसरण झाली. रशियाकडेही सोन्याचा मोठा साठा असून तो जागतिक बाजारपेठेत विक्री करायचा आहे. हे सोनं बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि भावात मोठी घसरण होऊ शकतो असा अंदाजही जाणकारांनी वर्तवला आहे.