चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आबेहोळ येथील एका घरात चोरट्यांनी १ लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील आबेहोळ येथील रहिवासी विठ्ठल हंसराज चव्हाण (वय ३५) धंदा मजुरी, रा.आंबेहोळ ता.चाळीसगाव यांच्या घराची भिंत दि ९ रोजी रात्रीच्या सुमारास फोडून चोरट्यांनी घरात घुसून कानातील सोन्याच्या २ रिंग २५ हजार रुपये किमतीच्या, हातातील चांदीचेकडे १५ हजार रुपये किमतीचे, ५०० रुपयाच्या १२० नोटा ६०००० रुपये असा एकूण १ लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी विठ्ठल हंसराज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी.लोकेश पवार करीत आहेत.