मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या महिन्यात जागतिक बँकिंग व्यवस्थेच्या संकटामुळे सोन्याने नवा उच्चांक गाठला होता. त्यानंतर दरात चढ-उतार झाली होती. तर कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज बाजारात सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. आज २२ कॅरेटसाठी तोळा सोन्याची किंमत ५५,१५० रुपये आहे. तर आज चांदीचे दर अंदाजे ७४,५०० रुपये प्रति किलो आहेत. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,००० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,००० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,००० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,००० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,००० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,०३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,०३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७४५ रुपये आहे. यामुळे लग्नसराईच्या निमित्ताने सोने चांदी खरेदीसाठी आजची संधी चांगली असल्याचे चित्र आहे.