TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी आंदोलन अखेर संपलं ; मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in कृषी, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

दिल्ली (वृत्तसंस्था) तब्बल ३७८ दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी शेतकरी आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली.

कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या आणखी काही मागण्या होत्या. या मागण्यांवर शेतकरी ठाम होते. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबतचा प्रस्ताव मिळाल्यानंतर आता शेतकरी त्यांचे तंबू काढत आहेत. घरी जाण्याची तयारी सुरु केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या पाच मागण्या पूर्ण केल्या असून आता आंदोलन करण्याचं काही कारण नाही असं म्हणत केंद्र सरकारने प्रस्ताव दिला. हे पत्र केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये केंद्राने शेतकऱ्यांच्या पूर्ण केलेल्या मागण्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. एमएसपी आणि आंदोलक शेतकर्यावरील गुन्हे मागे घेण्यात येतील अशी माहिती केंद्राने या पत्रातून दिली आहे. संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व आंदोलन स्थळांवरून ११ डिसेंबपर्यंत शेतकरी घरी परततील अशी माहिती शेतकरी नेते दर्शन पाल सिंग यांनी दिली. तसंच आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरी १५ जानेवारीला आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा देण्यात आली.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

काय म्हटलंय प्रस्तावात

१. एमएसपीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्र्यांनी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असणार आहेत. देशातील शेतकऱ्यांनी एमएसपी कशापद्धतीने मिळेल हे यामध्ये निश्चित केलं जाईल. सरकारने चर्चेवेळी आधीच याबाबत आश्वासन दिलं आहे.

२. शेतकरी आंदोलनादरम्यान, दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबबत केंद्र सरकारने म्हटलं की, युपी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा सरकारने हे गुन्हे मागे घेण्यात येतील हे स्पष्ट केलं आहे.

३. शेतकरी आंदोलनावेळी भारत सरकारच्या संबंधित विभागासह एजन्सीने आंदोलक आणि समर्थकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यास परवानगी दिली आहे. भारत सरकार इतर राज्यांना आवाहन करणार आहे की, शेतकरी आंदोलनाशी संबंधित गुन्हे मागे घ्यावेत. नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर हरयाणा आणि उत्तर प्रदेश सरकारने सहमती दर्शवली आहे. शिवाय पंजाब सरकारकडून गुन्हे मागे घेण्याबाबत याआधीच घोषणा केली आहे.

४. वीज बिलात शेतकऱ्यांवर परिणाम होणाऱ्या तरतुदींवर स्टेक होल्डर्स आणि संयुक्त किसान मोर्चासोबत चर्चा होईल. मोर्चासोबत चर्चा झाल्यानंतर यासंदर्भात संसदेत बिल सादर केलं जाईल.

५. धान्य काढल्यानंतर उरलेलं धान जाळण्यासंदर्भात भारत सरकारने जो कायदा केला आहे त्याच्या कलम १४ आणि १५ मध्ये गुन्हेगारीच्या ठपक्यातून शेतकऱ्यांना मुक्त केलं आहे. या पाच मागण्यांवर तोडगा निघाला असून आता शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवण्याचं काही कारण उरत नाही. त्यांना विनंती आहे की, शेतकरी आंदोलन मागे घ्यावं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
Next Post

ओबीसी राजकीय आरक्षणावरून आता अजित पवारांची रोखठोक भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यास मिळणार पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर ना. गुलाबराव पाटील यांना आरोग्यमंत्र्यांचे पत्र प्राप्त

May 6, 2021

जिल्हा बँकेची कृषिकर्ज वसुली 650 कोटींवर, गुलाबराव देवकर यांच्या कुशल नेतृत्वाची चुणूक !

April 1, 2022

‘विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर’- कपिल सिब्बल

November 22, 2020

पाळधी साई मंदिरात २४ पासून तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन

December 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group