मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४८,३६० आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,३६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,७६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,४१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,८१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,४१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,८१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,४१० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,८१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०० रुपये आहे.