नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सोने-चांदी दरात (Gold Silver Price) चढ-उतार सुरू आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव ०.०१ टक्क्याने वाढला आहे. तर चांदीचा दरात (Silver price) ०.१३ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये MCX वर १० ग्रॅम सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज सोनं वायदे भाव ४८,६६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. सर्वोच्च स्तरावरुन सोनं अद्यापही जवळपास ७,५०० रुपये स्वस्त मिळत आहे.
चांदीचा भाव
आज सोने दर ०.०१ टक्क्यांच्या वाढीसह ४८,६६६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर आज चांदीचा भाव काहीसा घसरला आहे. चांदीच्या दरात ०.१३ टक्क्यांची घसरण झाली आहे. आज १ किलो चांदीचा भाव ६२,६०६ रुपये आहे.