मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध रुग्णालयांमध्ये भरती केली जाणार आहे. या अंतर्गत प्रमुख कार्यकारी अधिकारी पदाची एकूण पाच पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. महापालिकेने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले असून, या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शैक्षणिक अर्हता : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. त्याच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी असावी. पालिकेच्या रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक आणि उपअधिष्ठाता यांना ही अट लागू नसेल. ही भरती एक वर्षाच्या कालावधीसाठी १७९ दिवसाकरीता मध्ये एक दिवसाचा खंड देऊन केली जाईल.
अनुभव : उमेदवाराला रुग्णालयीन प्रशासकीय कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार दहावी, बारावीमध्ये शंभर विषयांचा मराठी विषय उत्तीर्ण असावा. त्याला कॉम्प्युटर आणि इंटरनेटचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कायदा आणि नियम यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे उत्तम लेखन आणि संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० पर्यंत उमेदवारांचे वय ३८ वर्षे इतके असावे.
कामाचे स्वरुप : या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रमुख रुग्णालयांमध्ये नियुक्ती दिली जाईल. तिथे खातेप्रमुखांनी दिलेली सर्व कामे करावी लागतील.
पगार : उमेदवारांना दरमहा ८० हजार रुपये पगार मिळेल.
अर्ज प्रक्रिया : उमेदवारांनी १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये आपला अर्ज ‘आवक जावक विभाग, रा.ए.स्मारक रुग्णालय, तळ मजला, महाविद्यालय इमारत, परळ, मुंबई- ४०० ०१२’ या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.