मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने एमपीएससी ग्रुप सीमध्ये नोकरभरती सुरू केली आहे. त्यासाठी आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर लॉग ऑन करून अर्ज करू शकता.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख २२ डिसेंबर २०२१
अर्ज करण्याची अखेरची तारीख : ३१ जानेवारी २०२२
प्रवेश परीक्षेची तारीख ३ एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा ६ ते १७ ऑगस्ट २०२२
या जागांसाठी भरती
उद्योग निरीक्षक – १०३
दुय्यम निरीक्षक – ११४
तांत्रिक सहाय्यक – १४
कर सहाय्यक – ११७
लिपिक टंकलेखक (मराठी)- ४७३
लिपिक टंकलेखक (इंग्रजी) – ७९
एकूण – ९००
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण डिप्लोमा किंवा पदवीधर असणे अनिवार्य आहे. एमपीएससीच्या पदासांठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यासाठी एमपीएससीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर परिपत्रक जारी केले आहे. अर्जदारांना आधी ३ एप्रिल रोजी होणार्या प्रवेश परीक्षा देणे अनिवार आहे. तसेच या पदांसाठी वयोमर्यादा ही १९ ते ३८ वर्ष आहे.