TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशसाठी आनंदाची बातमी: धरणगाव रेल्वे स्टेशनला ३ नवीन गाड्यांचे थांबे मंजूर

vijay waghmare by vijay waghmare
March 22, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) : खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि हैदराबादकडे धावणाऱ्या ३ विशेष रेल्वे गाड्यांचे थांबे धरणगाव रेल्वे स्टेशनवर मंजूर झाले आहेत. या निर्णयामुळे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ होणार आहे. यासाठी खान्देश प्रवासी असोसिएशन आणि स्थानिक नागरिकांनी खासदार स्मिताताई वाघ यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

मंजूर झालेल्या गाड्या आणि वेळापत्रक:

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

वलसाड-दानापूर विशेष एक्सप्रेस (09025/26)09025: दर मंगळवारी दुपारी १:३४ वाजता धरणगाव येथून जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा आणि दानापूरकडे रवाना होईल.09026: दर बुधवारी दुपारी ४:३० वाजता धरणगाव येथून नंदुरबार आणि वलसाडकडे जाईल.

सुरुवात: २५ मार्च २०२५ पासून

बांद्रा-रेवा जनसाधारण विशेष एक्सप्रेस (09129/30)09129: दर शुक्रवारी दुपारी १:३४ वाजता धरणगाव येथून जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, कटनी, सतना आणि रेवाकडे रवाना होईल.09130: दर शनिवारी पहाटे ३:३२ वाजता धरणगाव येथून अंमळनेर, नंदुरबार आणि बांद्राकडे जाईल.सुरुवात: २८ मार्च २०२५ पासून.राजकोट-महबूबनगर विशेष एक्सप्रेस (09575/76)09575: दर मंगळवारी पहाटे ३:४२ वाजता धरणगाव येथून भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, काचीगुडा आणि महबूबनगरकडे रवाना होईल.09576: दर बुधवारी दुपारी ४:४२ वाजता धरणगाव येथून नंदुरबार, सुरत, अहमदाबाद आणि राजकोटकडे जाईल.सुरुवात: २५ मार्च २०२५ पासून.

खान्देश प्रवासी असोसिएशनचे आवाहन

खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेशदादा तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन यांच्यासह सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे आणि जतीन नगारिया यांनी सर्व प्रवाशांना या नवीन सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.स्थानिकांचा उत्साहया निर्णयामुळे धरणगाव परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे स्थानिकांनी नमूद केले असून, त्यांचे आभार मानले आहेत. ही नवीन थांबे प्रवास सुलभ करण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

खळबळजनक : जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिव्यागांच्या कारवाईत जि.प.चा ‘यूटर्न’

January 31, 2026

अरविंद देशमुख यांची शासनाच्या आरोग्य समितीवर निवड !

March 16, 2024

चाळीसगाव : वन विभागाचा वरिष्ठ अधिकारी म्हणून शाळेत कार्यक्रमाला आला अन् अडकला जाळ्यात !

July 22, 2023

जामनेर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group