मुंबई (वृत्तसंस्था) भारतात रेशन कार्ड (Ration Card) हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज (Document) मानला जातो. प्रत्येक भारतीयाला त्याच्या आर्थिक स्थितीनुसार रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो आणि आर्थिक स्तरानुसार मिळणाऱ्या रेशन कार्डवरून सरकारी योजनांचा लाभ घेणं शक्य होतं. त्याशिवाय रेशन कार्डचे इतरही अनेक फायदे नागरिकांना घेता येणार आहेत.
तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल, तर तुम्हाला ओळख (Identity) आणि रहिवासी पुरावा (Residential Proof) म्हणून शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड (Ration Card) वापरता येते. वाहन चालविण्याचा परवाना (Driving License) बनवण्यासाठीदेखील हा वैध पुरावा (Valid Proof) मानला जातो. शिधापत्रिका असल्यास एलपीजी कनेक्शन मिळणे सोपे होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सर्व शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला मोफत धान्य दिले जात आहे. सध्या देशात सुमारे ८० कोटी लोक याचा लाभ घेत आहेत. शिधापत्रिकेचे फायदे एवढ्यापुरतेच मर्यादित नसून इतरही अनेक कामे सुलभ करतात. आता सरकारने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ लागू केले आहे. या बदलानंतर तुम्ही देशात कुठेही कोणत्याही राज्याच्या शिधापत्रिकेचा लाभ घेऊ शकता. ते बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि ऑनलाइन अर्ज घरी बसून करता येतो
रेशन कार्ड हा वैध ओळखपत्र आणि रहिवास पुरावा
रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यापूर्वी, त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. शिधापत्रिकेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ओळखपत्र आणि पत्ता पुरावा या दोन्ही रूपात वापरले जाऊ शकते. अनेक उद्देशांसाठी वैध आयडी आणि पत्ता पुरावा म्हणून रेशनकार्ड उपयोगात आणता येतं. रेशनकार्डच्या माध्यमातून तुम्हाला मोफत अन्नधान्याव्यतिरिक्त, अनुदानावर अन्नपदार्थ आणि इंधन (Fuel) खरेदी करू शकता.
शिधापत्रिकेसाठी घरबसल्या ऑनलाईन असा करा अर्ज
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अन्न, पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
यानंतर, सर्वप्रथम, NFSA 2013 अर्ज भरावा लागेल.
आता तुम्हाला ओळख आणि वास्तव्याचा पुरावा द्यावा लागेल.
ओळख पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट वापरता येईल.
आधार कार्ड, एलपीजी कनेक्शन, वीज बिल, टेलिफोन बिल, भाडे करार वैध पत्त्याचा पुरावा मानला जातो.
याशिवाय, तुम्हाला उत्पन्नाची हमी, कास्ट प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वत: चा पत्ता असलेले पोस्टकार्ड देखील सादर करावे लागेल.
ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, फी भरताच तुमचे काम पूर्ण होते.
यानंतर, सरकारी अधिकारी तुमची पात्रता तपासतील आणि दिलेल्या माहितीची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.
पडताळणीमध्ये सर्व माहिती बरोबर आढळल्यास, येत्या काही दिवसांत शिधापत्रिका तुमच्या पत्त्यावर पाठवली जाईल.