मुंबई (वृत्तसंस्था) गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात विक्रमी भरारी घेतल्याचे बघायला मिळाले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) संकेतस्थळानुसार 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 1,451 रुपयांची वाढ होऊन ते 59,671 रुपयांवर पोहोचले. (Gold-Silver Price Today)
2 फेब्रुवारी रोजी सोने आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. तेव्हा त्याची किंमत 58 हजार 882 रुपए प्रति 10 ग्रॅम एवढी होती. शेअर बाजारातील चढउतारामुळे सोने चालू वर्षाच्या अखेरपर्यंत 65 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दुसरीकडे चांदीही 68 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. सराफा बाजारात तिचा दर 1477 रुपये वधारून 68250 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
दरम्यान, गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,३०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,३२० प्रति १० ग्रॅम आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७२१ रुपये आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३२० रुपये असेल. तर नागपूरमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३२० रुपये इतका असेल.