धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलचा इयत्ता १० विचा १०० टक्के निकाल लागला. सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राहिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करतांना इयत्ता ९ वी चे गुण, तोंडी परीक्षा व १० वी ची पूर्व परीक्षा या आधारावर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये आर्या विनोद जैन या विद्यार्थिनीने ९८.४०% गुण संपादन करून प्रथम क्रमांक, कौस्तुभ शशिकांत महाजन या विद्यार्थाने ९६.६०% गुण संपादन करून द्वितीय क्रमांक तसेच कल्याणी विनोद माळी या विद्यार्थिनीने ९५.६०% गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकावला.
इतर सर्व विद्यार्थांनी देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, वर्गशिक्षका भारती तिवारी, दहावीच्या विषय शिक्षिका अनुराधा भावे, सपना पाटील, सहशिक्षक लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड, अमोर सोनार यांच्यासह GSA स्कुल मॅनेजमेंट, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त केल्या.