चाळीसगाव (प्रतिनिधी) पाणी चळवळीचे प्रणेते तसेच सक्तवसुली संचालनालयाचे सहआयुक्त उज्वलकुमार चव्हाण हे चाळीसगाव येथे आले असता त्यांनी वर्धमान भाऊ धाडीवाल यांच्या कार्यालयात वर्धमान भांडवल मित्र मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी संपूर्ण लॉकडाऊन काळात केलेल्या अन्नपूर्ण सेवेच्या कार्याचे कौतुक करून आपल्यासारखे अनेक लोक या समाजात सेवाभावी वृत्तीने उभे राहत असल्याने समाज घटकात चांगले कार्य उभे राहत आहे. असे कौतुकास्पद उद्गार काढून सर्वांना शुभेच्छा देत असतानाच वर्धमान भाऊ धाडीवाल यांचे खास करून कौतुक त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. आज उज्वलकुमार यांचा वाढदिवस असल्याने त्यांना सर्व मित्र परिवारा च्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी समता सैनिक दलाचे नानासाहेब बागूल, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ, डॉ. मंदार करंबळेकर, डॉ. देवेंद्र पाटील, पत्रकार मुराद पटेल, गणेश आप्पा गवळी, तुषार निकम, गजानन मोरे, उमेश पवार, चुडामण पाटील, रामलाल मिस्तरी, सचिन आमले आदी उपस्थित होते.