धरणगाव प्रतिनिधी । दि. २० सप्टेंबर २०२० रविवार रोजी बामसेफच्या ऑफशुट विंगच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून बामसेफ व सहयोगी संघटनांच्या वतीने धरणगाव शहराध्यक्षपदी गोरख देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय किसान मोर्चा या शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या बहुजनवादी संघटनेच्या धरणगांव शहर अध्यक्ष पदी मा.गोरख देशमुख ( लहान माळीवाडा ) यांची निवड राष्ट्रीय किसान मोर्चा चे जळगाव जिल्हा अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केली. छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांचा जन्मदिवस २० सप्टेंबर रोजी मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला . शुभेच्छा देण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्र आले होते याच प्रसंगी बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील सर व राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बाळुभाऊ चौधरी यांनी गोरख देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बामसेफ व सहयोगी संघटनांच्या वतीने गोरख देशमुख यांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब वाघ, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , बामसेफचे उपाध्यक्ष हेमंत माळी व किशोर पवार, महासचिव आकाश बिवाल, व्ही. टी. माळी, बुद्धीष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष – निलेश पवार, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष नगर मोमीन, सिराजभाई कुरेशी, अमोल बिऱ्हाडे, रईस मोमीन, करीम लाला, बबलू वाघमारे यांच्यासह बामसेफ व सहयोगी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.