चोपडा (प्रतिनिधी) भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
चोपडा येथे भारतीय जैन संघटनेतर्फे राम गोपाल गोशाळेत जवळपास 70 ते 75 गाईंना सारखी ढेप व गुळ खाऊ घालण्यात आले. दोन क्विंटल सरकी ढेप व जवळपास 70 किलो गुळाचे पाणी करून प्रत्येक गाईला पाजण्यात आले. यावेळी भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष निर्मल जैन सचिव गौरव कोचर विभागीय उपाध्यक्ष लतिष जैन बीजीएसचे दिनेश लोडाया, चेतन टाटिया, दर्शन देशलहरा, खजिनदार अभय ब्रह्मेचा, क्षितिज चोरडिया, आनंद आचलिया, भूषण जैन,आकाश जैन, शैलेश राखेचा, दिनेश बोरा आदी हजर होते.