नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज कोरोनाच्या (Corona) काळात अनाथ झालेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन (PM Cares for Children Scheme) योजना सुरू केली. अनाथ मुलांच्या पाठिशी सरकार भक्कमपणे उभं आहे, या मुलांना सर्व प्रकारची मदत सरकार देईल असं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या योजनेची घोषणा केली. या योजनेचे पासबुक तसेच आयुष्यमान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत, आरोग्य कार्ड देखील देण्यात आले. ‘ज्यांनी कोरोनामुळे आपल्या आई, वडिलांना गमावले आहे. त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले असतील. त्यांनी किती कठीण काळात असतील हे मला माहीत आहे. त्यांचा रोजचा संघर्ष आहे, आज जी मुलं आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, त्यांच्या वेदना शब्दात मांडणं कठीण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कर्जाची सुविधा
या मुलांना जर प्रोफेशनल कोर्स किंवा शिक्षणासाठी कर्जाची गरज असेलतर त्यांनी ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन’ या योजनेतून कर्ज मिळू शकते. इतर दैनंदिन गरजांसाठी व इतर योजनांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी दरमहा ४ हजार रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा मागिल वर्षी केली होती. अगोदर या योजनेचा लाभ घेण्याची तारीख ३१ डिसेंबर २०२१ होती. पण पुढं याची मुदत वाढवून २८ फेब्रुवारी केली.