नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी कामासाठी उत्तराखंडला जाणार होते. त्यामुळे नियमानुसार त्यांना सरकारी विमान नाकारण्यात आले. मात्र, व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियम आहे. एरवी राज्यपालांना महाराष्ट्र सरकारकडून हेलिकॉप्टर आणि विमान कायम उपलब्ध करुन दिले जाते. पण यावेळी तांत्रिक अडचणींमुळे तसे करता आले नाही. अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
ते गुरुवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राज्यपालांना विमान नाकारल्यामुळे निर्माण झालेल्या वादासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले. राज्य सरकारने सूडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांचा आदर करतात. तर सरकारने राज्यघटनेतील नियमांचं पालन करणे, हा अहंकार आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मात्र, व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियम आहे. एरवी राज्यपालांना महाराष्ट्र सरकारकडून हेलिकॉप्टर आणि विमान कायम उपलब्ध करुन दिले जाते. पण यावेळी तांत्रिक अडचणींमुळे तसे करता आले नाही. भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचे विमान वापरावे, थोडा फार त्यांच्यावरही टाकावा, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
कोरोनाचा धोका असल्यामुळे आपण सरकारी विमानाने प्रवास करण्याचे ठरवले, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले. मात्र, खासगी विमानात कोरोनाचा धोका नाही, असे कोणी सांगितले आहे का? राज्यपालांना कोरोनाची भीती वाटत असेल तर त्यांचं वय पाहता त्यांनी राजभवनातच राहिलं पाहिजे. आम्ही राज्यपालांचा पूर्णपणे आदर करतो. आता ते सरकारचा किती आदर करतात ते माहिती नाही. राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्त्या करत नसतील तर तो राज्यघटनेचा अपमान आहे. सध्या राजभवनात भाजपचे पक्षकार्य चालते, असे लोकांचे म्हणणे आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मनात राज्यपालांबद्दल आदर आहे. त्यांनी राज्यपालांचा अपमान केलेला नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.