जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील विटनेर येथील डॉ. निलेश सुभाषचंद्र (जैन) ब्रम्हेचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिनाच्या निमत्ताने स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जीपीएस फाउंडेशनतर्फे दप्तर वाटप करण्यात आले.
आज ध्वजारोहण झाल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण दिले तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायिले. हा कार्यक्रम झाल्यावर विटनेर येथील डॉक्टर निलेश सुभाषचंद्र जैन (ब्रम्हेचा) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते.