अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील इंधवे गावात ग्रामपंचायत कार्यालय भूमीपूजन सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते कोरोना नियमांचे पालन करुन संपन्न झाला.
या कार्यक्रमाला आमदार पाटील उपस्थित होते. यांच्यासह सरपंच जितेंद्र पाटील, माजी जि प सदस्य प्रविण पाटील, जिराळीचे सरपंच सुनील पाटील, सुमठणे सरपंच अविनाश पाटील, पिंपळकोठा सरपंच महेंद्र पाटील, भोलाने सरपंच शिवाजी पाटील व गावातील जेष्ठ नागरिक संतोष धनगर पाटील, रवी पाटील, धनराज फकिरा पाटील, घनशाम पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पिंटू पाटील यांनी पेव्हर ब्लॉक व गार्डनची संकल्पना आमदारांपुढे मांडली. आमदारांनी गार्डनची इंधव्याची संकल्पना एक मॉडेल म्हणून संपूर्ण मतदारसंघात राबवण्याची इच्छा व्यक्त केली व एकंदरीत इंधव्याचे विकास पर्वाची सुरुवात उत्तम झालेली आहे, आजचे वातावरण पाहून खुप आनंद झाला असे उद्गार आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले.