जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातील वाकडी गावातील माजी सरपंच कै राजेंद्र धर्मा पाटील व विद्यमान सरपंच राधाबाई राजेंद्र पाटील याचे सुपुत्र ग्रामसेवक बबन आप्पा यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बबन आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त फुलगुच्छ देऊन तसेच केक, पेढे भरवून मोठया उत्सवात संपूर्ण गावकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व परिवहन मंत्री गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र विशाल देवकर यांनी हजेरी लावत बबन आप्पांचा मोठया जल्लोषात सत्कार केला. याप्रसंगी जळगाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष बापुभाऊ परदेशी, उपाध्यक्ष राजेश वाडेकर, डॉक्टर नितीन पाटील तसेच गावातील सर्व युवक कार्यकर्ते, वाकडी गावातील उपसरपंच ईश्वर पाटील, तसेच सर्व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
















