वैजापूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत वैजापूर पंचायत समितीने मंजूर केलेल्या गाय-गोठा प्रकरणातील कुशल बिल देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या राहेगाव (ता. वैजापूर) येथील ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. २८) रोजी दुपारी रंगेहाथ पकडले. अर्जुन गंगाधर खरबडे वय (वय ४४, पद ग्रामसेवक ) असे आरोपीचे आहे.
तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत राहेगाव (ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) येथील ग्रामपंचायत सदस्य असून त्यांचे पती तक्रारदार यांचे व त्यांचे गावातील इतर ६ लाभार्थी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षात मंजुर गाय-गोठा बांधल्यानंतर झालेल्या खर्चाची बीलाच्या मोजमाप पुस्तिका (एम बी) वर सह्या केल्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक खरबडे यांनी प्रथम प्रत्येकी ५ हजार रूपये एम बी प्रमाणे व त्यानंतर तडजोडी अंती प्रत्येकी ३ हजार रुपये प्रमाणे एकूण २१ हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु मुळ तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रार शहनिशा करून सापळा रचत पोलिस अधिक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलिस अधिक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हरिदास डोळे, पोलीस उप अधीक्षक जाधवर सापळा पथक पोलीस हवालदार साईनाथ तोडकर, पोलीस हवालदार, राजेंद्र जोशी चालक पो अमलदार दैठणकर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई पंचा समक्ष तडजोडी अंती १० हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. शुक्रवारी २८ रोजी खरबडे ग्रामसेवक यांना राहेगाव (ता. वैजापूर) येथे पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून १० हजार स्वतः लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.