पाटणा (वृत्तसंस्था) बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयू यांचं गठबंधन असलेलं सरकार बनणार आहे. निवडणुकीतील पराभवानंतर आज लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी मंथन बैठक पार पडणार आहे. बैठकीसाठी महागठबंधनमधील सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “जनता मालक आहे. त्यांनी एनडीएला जे बहुमत दिलं, त्यासाठी जनता-जनार्दनला माझा प्रणाम. मी पंतप्रधान मोदींचे त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्यासाठी आभार मानतो. बिहारला लोकशाहीचं जमीन का म्हटलं जात हे तेथील जनतेने सिद्ध करुन दाखवलं आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. आम्ही सर्व नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएनच्या कार्यकर्ता आणि बिहारमधील जनतेसोबत विकासाचा संकल्प सिद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असं म्हणत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं आहे.
महागठबंधनच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. ज्यामध्ये काँग्रेस आणि वामदलांचे वरिष्ठ नेते देखील सहभागी होणार आहेत. बैठक सकाळी ११ वाजता राबडी देवी यांच्या निवासस्थानी होणार आहे. बैठकीनंतर महागठबंधनाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते.
















