भुसावळ (प्रतिनिधी) येथे आदयकवी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आई फाऊंडेशनतर्फे दोन दिवसीय भव्य तालुका स्तरीय बॉक्सिंग स्पर्धाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा समिती जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर सोनवणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य रवी बाविस्कर, अभियंता PWD न.पा.भुसावळ सतीश सपकाळे, नगरसेवक भिमराज कोळी, माजी नगरसेवक शांताराम जाधव, अध्यक्ष SC/ST असो.शाखा POH व्यासपीठावर आई फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत साहेबराव पाटील, सचिव अभय आखाडे, कोषाध्यक्ष किरण पाटील, प्रितम टाक होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार आणि दिप प्रज्वलन करून प्रथम खेळाडूचे बाऊट लाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटक चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या भाषणातून खेळाडूंचे मनोबल आणि बॉक्सिंग खेळा विषयी माहिती दिली.
भुसावळ तालुक्यातील ६० ते ७० खेळाडूंनी भाग नोंदविला असून पहिल्या दिवशी ३०/३५ खेळाडू खेळ खेळले. तर राहुल घोडेस्वार, सुनील नवगीरे, पवन शिरसाठ आदींनी पंचाची भुमिका बजावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य राहुल सोनवणे, योगेश कोलते, संदिप निकम, नितीन ठाकरे ,सागर काटकर, योगेश बागुल, सागर बागुल, जयदेव मोरे, सोनु नेतकर, आदित्य अहिरे, पवन बडगे, अतुल कोळी, नितीन कोळी आदींनी सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश लोंढते यांनी केले.