नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बंगळुरुमध्ये पुढच्या आठवडयात होणाऱ्या मेगा एअर-शो मध्ये सेमी-स्टेल्थ ड्रोनचे मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानासोबत संचालन करण्याच्या दृष्टीने ‘वॉरियर’ ड्रोन बनवण्यात येत आहे. युद्धभूमीमध्ये दोन्ही विमानं एकत्र असताना ‘वॉरियर’ ड्रोन ‘तेजस’चे रक्षणही करेल आणि शत्रूवर हल्लाही करेल. पुढच्या तीन ते पाच वर्षात ‘वॉरियर’ ड्रोनचे पहिले प्रोटोटाइप हवेत झेपावेल, अशी अपेक्षा आहे.
भारताच्या पहिल्या सेमी-स्टेल्थ ड्रोनची प्रतिकृती बनवण्याचे काम सुरु आहे. बंगळुरुमध्ये पुढच्या आठवडयात होणाऱ्या मेगा एअर-शो मध्ये सेमी-स्टेल्थ ड्रोनचे मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ‘वॉरियर’ असे या ड्रोनचे नाव आहे. CATS किंवा कॉमबॅट एअर टीमिंग सिस्टिम या स्वदेशी कार्यक्रमातंर्गत हे ड्रोन विकसित करण्यात येत आहे. भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानासोबत संचालन करण्याच्या दृष्टीने ‘वॉरियर’ ड्रोन बनवण्यात येत आहे. एचएएलकडून यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.
“एका तेजस फायटर विमानांमधून अनेक वॉरियर ड्रोन्सचे नियंत्रण केले जाईल” असे या प्रकल्पाशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. प्रत्येक हवाई मोहिम यशस्वी करणे आणि वैमानिकाच्या जीवाला असणारा धोका कमी करणे, ही या वॉरियर ड्रोनच्या निर्मितीमागची कल्पना आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांनी वॉरियर ड्रोन सुसज्ज असेल.