नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन अज्ञात अतिरेक्यांना ठार करण्यात आलं आहे. बाबा मोहल्ल्यात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने संबंधित परिसराला वेढा दिला आणि शोधमोहीम राबवली, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर दोन दहशतवादी अद्याप लपून बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांच्या तीने सतत गोळीबार सुरु करण्यात येत आहे. ज्यास सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी अन्सार गजवतुल हिंदचा नेता इम्तियाज अहमदला घेराव घातला आहे.
बाबा मोहल्ल्यात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने त्या भागाला वेढा घातला आणि शोधमोहीम राबविली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवादी एका मशिदीत लपून बसले आहेत. दहशतवाद्यांना शरण जाण्यासाठी उद्युक्त करता यावे म्हणून सुरक्षा दलांनी दहशतवाद्याचा भाऊ आणि स्थानिक इमाम यांना मशिदीत पाठवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. यासाठी दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी इमामांना पाठविण्यात आले आहे. शोध मोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, यावर सुरक्षा दलाने प्रत्युरासाठी केलेल्या कारवाईनंतर चकमकीला सुरुवात झाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.