नशिराबाद (प्रतिनिधी) हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त बस स्थानक येथील शिवसेना कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नशिराबाद बस स्थानकावरील शिवसेना कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी बस स्थानक कावर लावण्यात आलेल्या फलकाजवळ देखील मेणबत्ती जाळून बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी युवासेना शहर प्रमुख चेतन बर्हाटे यांनी बाळासाहेब यांचे विचार उपस्थित शिवसैनिकांना सांगून शिवसेना पक्षाला बळकटी आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन या कार्यक्रमाप्रसंगी केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, चंदु भोळे, माजी सरपंच विकास पाटील, यूवासेना शहरप्रमुख चेतन बर्हाटे, विनायक धर्माधिकारी, आबा माळी, महेंद्र कोळी, कैलास नेरकर, बंडु रत्न पारखे, नितीन बेंडवाल, बापु चौधरी मोहन कोलते, मनोज देशमुख, दिनेश माळी, सोहन पाटील, सतिश रोटे, भुषण कोल्हे, हरीष येवले, पांडु बाविस्कर, मयुर देवरे, शुभम सोनार, आबा सोनार, निलेश धनगर आदी उपस्थित होते.