नशिराबाद (प्रतिनिधी) येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात वारकरी संप्रदायचे आद्य प्रचारक श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज वारकरी संप्रदायाच्या वतीने भक्तीभावात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक सहत्नीक काजल व प्रशांत संजय माळी यांच्या हस्ते करण्यात आला तद्नंतर श्री हभप रमेश पाटील सर यांच्या हस्ते पालखीचे पुजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या दिंडी सोहळ्याची सुरूवात मुक्तेश्वर मंदिर पासून तर गावातील प्रमुख मार्ग द्वारे संत सावता मंदिर जवळ सांगता करण्यात आली या सोहळ्यात सर्व जन विठ्ठलाच्या नामात मंत्र मुक्त होऊन संपूर्ण परिसर भक्तिमय करण्यात आला.
दिंडी सोहळ्यानंतर कल्याचे भजन नंतर संत सावता महाराजांच्या आरती सह पत्नी सौ वदना ह भ प सुनिल शास्त्री करण्यात आला व नंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुनिलशास्त्री महाराज, माजी सरपंच विकास भाऊ पाटील, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, माजी सरपंच पंकजभाऊ महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकासभाऊ धनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव माळी, हभप रमेश पाटील सर, सुरेश माळी, सोपान महाजन, जगन पाटील, महेश माळी, दगा महाजन, सुधाकर महाजन, प्रमोद महाराज मानमोडीकर, तुळशीराम जगताप, सोपान शिवरामे, धनराज पाटिल, विठ्ठल माळी, मधुकर महाजन, प्रविण महाजन, अरुण पाटील, मोहन खारे, गणेश माळी व सुभाष माळी सर्व भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ उपस्थित होते.
सदर मिरवणुक संत शिरोमणी सावता महाराज मंदिरापासून फुले चौक – मेनरोड – नाईक वाडा या मार्गे पालखीवर पुष्प वृष्टी करून भव्य स्वागत गावातील भाविकांनी केले व महादेव मंदिराजवळ दिंडीची सांगता करण्यात आली. यानंतर काल्याचे भजनद्वारे व महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आला. नंतर सर्वांनी महाप्रसादाचा स्वानंद घेतला. या कार्यक्रमास सर्व मार्गदर्शन हभप सुनिल शास्त्री महाराज यांचे लाभले. त्यास सचिव पंढरीनाथ पाटील, अशोक पवार, संतोष पवार, हेमराज महाजन, भगवान पाटील, विकास पाटील, आबा पाटील, तेजस माळी, पत्रकार सुनिल महाजन, हर्षल महाजन, सचिन महाजन, संदीप जगताप, निलेश महाजन, रितेश महाजन, सुपडू चौधरी, वासुदेव महाजन, सुनिल महाजन व कार्यक्रमासाठी सर्व भजनी मंडळी, स्वयंपाकी नामदेव गुरुजी माळी, प्रभाकर पवार, बाबूलाल महाजन, चंदू फेगडे, सुधीर महाजन, काशिनाथ महाजन यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी, सदस्य,सर्व शाखा अध्यक्ष, युवक मंडळाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.