अमळनेर (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२३ व्या पुण्यतिथीनिमित्त बसस्थानकाजळील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, खा.शि.मंडळाचे जितेंद्र जैन, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, एल. टी.पाटील, बन्सीलाल भागवत, अशोक पवार, समाधान धनगर, हरचंद लांडगे, वसुंधरा लांडगे, नितीन निळे, अलीम मुजावर, संदीप घोरपडे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहिवद येथेही अभिवादन
दहिवद येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्यास आमदार अनिल पाटील यांनी माल्यार्पण केले. कार्यक्रमास सभापती सुभाष देसले, शिवाजी पारधी, सुनील आण्णा, अशोक हडपे, मल्हारराव धनगर, संभाजी धनगर यांच्यासह महिला व पुरुष समाज बांधव उपस्थित होते.