जळगाव (प्रतिनिधी) संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुळवले, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी भारदे, तहसिलदार (सामान्य प्रशासन) सुरेश थोरात, यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.