धरणगाव (प्रतिनिधी) स्थानिय महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे ” राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ” व ” युगपुरुष स्वामी विवेकानंद ” यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पुरोगामी विचारांचे – अभ्यासु व्यक्तिमत्व व्ही.टी. माळी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जेष्ठ शिक्षीका एम. के. कापडणे यांच्या हस्ते राष्ट्रमाता – राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रमुख वक्ते व्ही. टी.माळी यांनी जिजाऊंचे बालपण व बालपणापासून त्यांना मिळालेली शिकवण – युद्धनीती, राजनीती, बहुभाषांचे ज्ञान व माँसाहेबांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकच नाव दिले ते म्हणजे मावळा. यानंतर सतीप्रथा, अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद आदी गोष्टींना कडाडून आणि कृतीतून विरोध केला. आणि स्वराज्याचे एक नव्हे तर दोन छत्रपती घडवणारी राजमाता म्हणजेच माँसाहेब जिजाऊ यानंतर विवेकानंद यांच्याबद्दल सांगतांना त्यांना बालपणापासून परोपकार करण्याची वृत्ती होती याचे स्पष्टीकरण दिले व चारित्र्यसंपन्न, धर्माचे निकोप तत्वज्ञान मांडणारा विचारवंत, निष्काम कर्मयोगी, प्रभावी वक्ते असे विविध पैलू उलगडले व विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक घडला पाहिजे याबाबत स्पष्टीकरण दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्षा जेष्ठ शिक्षीका पी. आर. सोनवणे यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा मोलाचा संदेश दिला. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे. एस. पवार, एम. बी. मोरे, एस. व्ही. आढावे, सी. एम. भोळे, हेमंत माळी, व्ही. टी. माळी, व्ही. पी. वऱ्हाडे, एम. जे. महाजन, लिपीक जे. एस. महाजन, पी. डी. बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, जीवन भोई, अशोक पाटील, प्रदिप पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एन. कोळी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. बी. मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक बंधु – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.