धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सुवर्णमहोत्सवी शाळा- महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त महामातांना आज विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम.के. कापडणे व व्ही.पी.वऱ्हाडे यांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर व विद्येची खरी देवता – स्फूर्तिनायिका सावित्रीमाई फुले या महामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे. एस.पवार, एस.व्ही.आढावे, सी.एम.भोळे, हेमंत माळी, व्ही.टी.माळी, पी.डी.पाटील, जीवन भोई, अशोक पाटील ,जे.एस.महाजन, गोपाल महाजन नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, अजय पवार उपस्थित होते.