जळगाव (प्रतिनिधी) दोडे गुर्जर समाज संस्थान, जळगावच्या वतीने आज ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दोडे गुर्जर भवनात सरदार वल्लभभाई पटेल यांना आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी जळगाव दोडे गुर्जर संस्थानचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील व सचिव डॉ राधेश्याम चौधरी याच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी दोडे गुर्जर समाजाचे विश्वस्त हिरालाल चौधरी,रामचंद्र पाटील,रमण पाटील,निश्चल पाटील,प्रवीण पाटील, संजीवनी पाटील, सहसचिव उल्हासराव जाधव, दिलीप पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील व सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सरदार पटेलाच्या कार्यबद्दल माहिती दिली.
















