अमळनेर (प्रतिनिधी) येथे दि.५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटान)तर्फे अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी. महाजन यांना प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात ४३ मागण्यांपैकी काही प्रामुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत- १) डिसीपीएस / एनपीएस योजना रद्द करुन जुनी पेन्शन लागू करा. २) ३० वर्ष सेवा आणि ५०/५५ वर्ष वय पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून सक्तीने निवृत्त करण्याचे संविधान विरोधी धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे. ३) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅज्युटिची मर्यादा वाढून २५ लाख रू. करण्यात यावी. ४) महाराष्ट्रातील खाजगी संस्थामधील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच वेतन, महागाई व इतर भत्ते देणाऱ्या पूर्वीच्या कायद्यात बदल करु नये. असे अनेक महत्त्वपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भातील समस्यांच व शिफारशींचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी प्रोटान जिल्हा महासचिव मिलिंद निकम, कमलाकर संदानशिव, सोपान भवरे, अजय भामरे, ईश्वर महाजन, प्रा. जितेश संदानशिव, एम. आर. तडवी, सुनिल वाघ, दिनेश मोरे यांची उपस्थिती होती. प्रा.शिवाजीराव पाटील, मा. प्राचार्य चंद्रकांत जगदाळे, प्रा.डाॅ.राहुल निकम (प्रोटान- विभागीय सदस्य), प्रा.विजय गाढे, प्रा.एम.एन.संदानशिव, प्रा.विजय खैरनार (प्रोटान- विद्यापीठ सचिव), प्रा.डाॅ.डी.एन.वाघ, प्रा.लिलाधर पाटील, रणजित शिंदे, आर.बी.पाटील (प्रोटान- जिल्हा उपाध्यक्ष), प्रा.भानुदास गुलाले (प्रोटान- जिल्हा सहकोषाध्यक्ष), प्रा.विजय वाघमारे, नंदकुमार पाटील, बी.एल.सैंदाणे, डी.ए.सोनवणे, किरण मोहिते, निरंजन पेंढारकर, दत्तात्रय सोनवणे, पुरुषोत्तम माळी, देविदास घोडेस्वार, संजय पाटील, जितेंद्रसिंह ठाकूर, महेंद्र रामोशे, जितेंद्र पाटील, पंडीत भदाणे, जितेंद्र बि-हाडे, महेशकुमार पारेराव, रोशन साळूंके, किशोर सोनवणे, योगेश्वर पाटील, सुनिल सोनवणे, आ.बा.धनगर, प्रमोद साळुंखे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.