धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील गंभीर बनलेल्या पाणीपुरवठ्या प्रश्नी आता खुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटील हे ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. ना. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना तातडीने अंजनी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता धरणगाव शहरात पुढील दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
धरणगाव शहरात तब्बल 22 ते 25 दिवसानंतर पाणीपुरवठा सुरू होता. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज तात्काळ अंजनी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. धावडा तसेच पिंप्री येथे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. दोघंही ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरु आहे.
धावडा येथील मुख्य पाईप लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्याचे काम पुणे येथील एका कंपनीला देण्यात आले आहे. पुढील आठवडा भरात धावडा ते धरणगावची पाईप लाईनमधून पाणी पुरवठा सुरळीत होईल. मागील काही दिवसापासून गाळ काढण्याचे काम सुरु असल्यामुळे पिंप्री येथील शहराला पाणी पुरवठा केला जात होता. परंतु जमिनीतील पाणी साठा संपल्यामुळे धरणगावकरांवर पुन्हा एकदा पाण्याचे संकट निर्माण झाले होते. याप्रश्नी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना गटनेते पप्पू भावे, आणि शिवसैनिक रवींद्र कंखरे यांनी थेट पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. तसेच अंजनीत पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला. यानंतर पालकमंत्री ना.पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यानुसार अंजनी आज रात्रीपर्यंत १.२० दलघमी एवढे पाण्याचे आवर्तन पोहोचणार आहे.
त्यामुळे पुढील दोन दिवसात आता पाणी पुरावठा सुरळीत होणार आहे.
दरम्यान,पिंप्री ते धरणगाव फिल्टर प्लांट अशी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जुण्या पाण्याच्या टाकी पासून तर पाणी शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत 72 लाखांची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.
दुसरीकडे धरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी संपूर्ण गावात नवीन पाईप लाईन टाकावी लागणार आहे. शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री तथा विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून पाइपलाइनचे काम युद्ध पातळीवर करण्याचे नियोजन सुरु आहे. जेणे करून लवकरात लवकर शहराला नियमित पाणी पुरवठा होईल. दरम्यान, खुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटील हे ‘ॲक्शन मोड’वर आल्यानंतरच धरणगावचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.