जळगाव प्रतिनिधी – राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात, जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालक सचिव रामास्वामी एन. यांच्यासोबत जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामासंदर्भात चर्चा केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, यावेळी म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकास काम सुरू असून, कामांच्या संदर्भातील काही प्रश्न राज्य शासन स्तरावर प्रलंबित आहेत. या विषयांमध्ये पालक सचिव या नात्याने आपण लक्ष घालून प्रलंबित कामे व विषयांसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरा करून प्रलंबित विषय लवकरात लवकर मार्गी लावावेत असे सांगितले.
यावेळी पालक सचिव रामास्वामी, म्हणाले, जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात जे विषय प्रलंबित आहेत त्या संदर्भात मी स्वतः शासन स्तरावर पाठपुरावा करून अडचणी सोडवतो असे आश्वासन दिले. पालकमंत्री पाटील यांनी,चर्चेच्या सुरुवातीला पालक सचिव रामास्वामी यांचे स्वागत केले.
त्यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, उपस्थित होते.
 
	    	
 















