धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची रेशन संघटनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व मागण्या सर्वतोपरी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.
रेशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या !
१)आम्हाला मिळणारे मार्जीन वाढवून मिळावे मनी २)शासकीय गोदामातून येणारे धान्य पूर्ण मोजून मिळावे तसेच मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे ३) ekyc साठी प्रती व्यक्ती ५० रुपये शुल्क मिळावे ४) मार्जीन मनी त्वरित दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत मिळावे ५) इष्टांक वाढवून मिळावा ६) गोदामातून धान्य हे ज्यूट बारदान मधूनच मिळावे.
निवेदन देतांना हे होते उपस्थित !
रेशन संघटनेचे तालुकाध्यक्ष जी.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रभाकरअण्णा पाटील, सोपानशेठ पाटील, अमृत पाटील, दिलीप शिंदे, दिपक भदाणे, सुदर्शन पाटील, विशाल पाटील तसेच संघटनेचे मार्गदर्शक राजूशेठ ओस्तवाल तसेच अमोलभाऊ पाटील हे उपस्थित होते.