जळगाव (प्रतिनिधी) मौजे निंभोरा, ता. धरणगाव येथील रहिवाशी भागवत भिका पाटील यांचा शेतातून घरी परत येत असताना निंभोरे लगत खैऱ्या नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने १७ जुलै, २०२१ रोजी मयत झाले. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत स्व. भागवत पाटील यांच्या वारस पत्नी श्रीमती मालुबाई भागवत पाटील यांना चार लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पं. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी उपसभापती डी.ओ. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, तहसीलदार नितीनकुमार देवरे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.