धरणगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी किंमत योजनेंतर्गत मका , ज्वारी व बाजरी खरेदी केंद्राचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरोडल शेतकी संघाचे चेअरमन नवल पाटील हे होते.
धरणगाव येथे झालेल्या शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी किंमत योजनेंतर्गत मका , ज्वारी व बाजरी खरेदी केंद्राचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. महसूल विभागामार्फत ऑनलाइन सातबारा उपलब्ध झाल्याने शेतमाल खरेदीत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार असून, शेतकर्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
यावेळी एरंडोल शेतकी संघाचे व्हा चेअरमन संजय जाधव व संचालक भगवान बापूजी , प्रभाकर ठाकुर, माजी सभापती प्रमोद एरंडोल शेतकी संघाचे व्हा चेअरमन संजय जाधव व संचालक भगवान बापूजी, भगवान महाजन , गोटू काबरा मॅनेजर अरुण पाटील, देविदास पाटील, ऑपरेटर उमेष चौधरी तहसीलचे गोडाऊन मॅनेजर घुले साहेब अमळनेर शेतकी संघाचे प्रशासक गणेश महाजन व व्यवस्थापक संजय पाटील व सुभाष पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकर्यांच्या भरड धान्याला चांगला दर मिळण्यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र उपयोगी ठरणार असून त्याचा शेतकर्यांनी फायदा करून घेणे गरजेचे आहे. बाजारभाव व हमीभावात मोठा फरक असल्याने व्यापारीवर्गाकडून हमीभाव केंद्रावर बाजरी, ज्वारी व मका विक्रीला येणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जगभरात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.