जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तसेच गुलाबराव पाटील यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आपण रूग्णालयात उपचार घेत असून प्रकृती चांगली आहे. परंतु, आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.