TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा-२०२० शनिवार, दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ११ ते सकाळी १२ या वेळेत जळगाव शहरातील ३५ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरीता जिल्ह्यातून ११ हजार ४६३ परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. या परीक्षेकामी जिल्ह्यातील एकूण १ हजार १३० इतक्या अधिकारी/कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षेसाठी विहित उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपुर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

उमेदवारांसाठी विशेष सुचना

READ ALSO

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

प्रत्येक परीक्षेच्या उमेदवाराने संबंधित परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र (डाऊनलोड करुन प्रिंट केलेले) आणणे सक्तीचे आहे. विषयांकित परीक्षा यापुर्वी रविवार, ११ एप्रिल, २०२१ रोजी घेण्याचे नियोजित होते व त्यानुसार सदर परीक्षेचे प्रवेशासाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, उपलब्ध करुन देण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र प्रस्तावित ४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही,

परीक्षा कक्षात प्रवेश करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मुळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परिक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मुळ ओळखपत्र तसेच त्याची एक रंगीत छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्युटुथ, दुरसंचार साधने वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू तसेच पुस्तके, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर इ. साधने परीक्षा केंद्राच्या परीसरात वापरण्यास सक्त मनाई आहे. आयोगाने परवानगी नाकारलेली कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन/साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशव्दारजवळ ठेवावे लागेल व त्यासाधन/साहित्याची सुरक्षिततेची जबाबदारी संबंधिताची राहील.

उमेदवाराला स्वत:चा जेवणाचा डबा/अल्पोपहार व पाण्याची बाटली आणण्याची परवानगी आहे. परीक्षा केंद्रात काळ्या शाईचे बॉल पॉईट पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र मूळ ओळखपत्र व त्याची रंगीत छायांकित प्रत तसेच ओळखीच्या पुराव्याचे मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील सुचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.

ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा ३८ डिग्री सेल्सिअस अथवा १००.४ डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच उमेदवार यांनी आरोग्यसेतू ॲप डाऊनलोड करण्यात यावे.

या परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी/कर्मचरी तसेच उमेदवार यांना खालीलप्रमाणे साहित्य पुरविण्यात येणार आहे. बेसिक कोविड किट (bck) परीक्षेकरीता उपस्थित प्रत्येक उमेदवाराकरीता एक. Extra protective Kit &(EPK) परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी एक. Personal Protective Equipment Kit (ppek) फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या प्रत्येक उमेदवारांकरीता, प्रत्येक ५० उमेदवारामागे १ या संख्येत तसेच लक्षणे दिसून येत असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त समवेक्षकासाठी एक. विद्यार्थ्याने परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी त्यांचे प्रवेश प्रमाणपत्र हे पास म्हणून गृहीत धरण्यात येईल. जळगाव शहरातील परिक्षा केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेली शाळा/ महाविद्यालय परीक्षेच्यापूर्व तयारीसाठी व परिक्षेसाठी खुली राहतील.

परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. त्याकरीता आयोगामार्फत पुरवठादार संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्य संदर्भात परिक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेवून त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे. या परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. असेही निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

June 21, 2025
गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
Next Post

संजय राऊतांना अंतर्गत धोका निर्माण झाला असावा ; सुरक्षेवरून आशिष शेलारांचा टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान झाल्यास सर्वात आधी कोणता निर्णय घ्याल?, काय म्हणाले राहुल गांधी

November 8, 2021

आरएसएसच्या सर्व्हेने मध्य प्रदेश भाजपात खळबळ ; काँग्रेसचा मोठा दावा !

June 6, 2023

धनंजय देसाई यांची नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्या घरी सदिच्छा भेट !

January 22, 2021

पहिली ते आठवीच्या विध्यार्थ्यांना विनापरिक्षा करणार पास, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group