TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रूपाणी यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला संधी दिली, त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे रूपाणी यांनी आज आपला राजीनामा सोपवला.

राजीनामा दिल्यानंतर रूपाणी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. राजीनामा दिल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रुपाणी म्हणाले, मी राजीखुशीनं राजीनामा दिला आहे, कुणाचाही माझ्या दबाव नाही. मला संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच माझ्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानतो, पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी पार पाडणार आहे. जेपी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणुका लढतो आणि २०२२ च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहे. गुजरातला आता नवं नेतृत्त्व मिळेल. नवीन नेतृत्त्वाला संधी देणं ही भाजपची परंपरा आहे. पदाचा राजीनामा देऊन संघटनेसाठी काम करण्याची इच्छा आहे, असं देखील रूपाणी या वेळी म्हणाले.

READ ALSO

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांचा राजीनामा अनेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विजय रुपाणी राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. २६ डिसेंबर २०१७ रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये बहुमत मिळवले होते. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

रुपाणी यांच्या विषयी थोडक्यात

गुजरातमध्ये पुढील वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली. विजय रूपाणी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते गुजरात विधानसभेत पश्चिम राजकोटचे प्रतिनिधित्व करतात ७ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांनी गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पदही भूषवलं होतं. विजय रुपाणींचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी रंगून, बर्मा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमणिकलाल आणि आईचे नाव मायाबेन. ते जैन धर्माचे अनुयायी होते. रमणिकलाल कुटुंब १९६० मध्ये बर्मा सोडून भारतात आले. मग ते राजकोट, गुजरात येथे राहू लागले. विजय रुपाणींनी धर्मेंद्रसिंह महाविद्यालयातून पदवी घेतली आणि नंतर सौराष्ट्र विद्यापीठातून एलएलबी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

संत गजानन महाराज मंदिरात पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संताजी महाराज जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला जळगावात भव्य मोटारसायकल रॅली

December 7, 2025

आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न दुपटीने वाढवू : सभापती नरेंद्र पाटील !

October 31, 2023

गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त: कुलगुरू डॉ. शिर्के !

February 23, 2024

आमदार किशोर पाटील हेच ‘त्या’ वायरमनच्या मृत्यूला जबाबदार ; भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदेंचा आरोप

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group