जळगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा व उत्तराखंड या राज्यात भाजपने निर्विवाद वर्चस्व राखत सत्ता स्थापनेच्या मार्गावर आहे. भाजपच्या या विजयाचा राज्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात देखील भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करत गुलाल देखील उधळण्यात आला.
जळगावात गुलालाची उधळण
चार राज्यातील विजयाचा जल्लोष जळगावात भाजप कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून ढोल ताशा वाजवत केला. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाबाहेर विजयोत्सव साजरा केला जात आहे. महिला कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष केला.
















