धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रात आज (दि. 3 जुलै) सोमवार रोजी सकाळी भूपाळी आरती नंतर सकाळी 8.30 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत दिवसभरात पंचक्रोशीतील सुमारे 6 हजारहून अधिक भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक पूजन दर्शन व सेवा रुजू केली. तसेच हजारोंच्या संख्येने भाविकांनी श्री स्वामी चरीत्र सारामृत या ग्रंथांचे पारायण व श्री स्वामी समर्थ मंत्र जप केला.
सकाळी 10.30 च्या आरतीनंतर केंद्राचे तालुका सेवक यांनी गुरू का करावा? व गुरू व भक्ती तसेच जिवनात गुरु करणे फार महत्त्वाचे आहे. जीवनात संयम फार महत्वाचा आहे आणि तो अध्यात्म शिवाय मिळत नाही. सुखापेक्षा दुःखात गुरु आठवतात. पण गुरुचे महत्व समजून घेतले जात नाही, या विषयावर वेगवेगळे अनुभव सांगण्यात आले. केंद्रात दरबारात सत्यदत्त पूजन करण्यात आले. तसेच मार्गातील सुरू असलेले कार्यरत 18 विभाग व सेवा कशी करावी त्याचे प्रत्यक्ष स्टॉल लावण्यात आले.
देव्हारा कसा असावा, कृषीशास्त्र विभाग, सिडबॉल पूजन व जागतिक पर्यावरण हातभार लावणे, मराठी अस्मिता सणवार उत्सव, देवीचे अलंकार, खंडोबा मानसन्मान, सत्यनारायण पूजन मांडणी, दिवाळी पूजन मांडणी, गर्भ संस्कार विभाग, शिशु संस्कार, बालसंस्कार, आरोग्य विभाग, पारंपारिक वस्तूचे प्रदर्शन, गाईचा शेणा पासून बनवलेले वस्तू, स्वयंरोजगार विभाग, वास्तुशास्त्र विभाग, प्रश्नोत्तर विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, जनकल्याण योजना फॉर्म भरणे, स्वामी सेवा मासिक फॉर्म भरणे तसेच श्री गुरुपीठ यूट्यूब चैनल तसेच दिंडोरी प्रणित सेवा मार्ग यूट्यूब चैनल या चैनलची आलेल्या भाविक सेवेकऱ्यांना माहिती देण्यात आली.
तसेच चॅनल सबस्क्राईब करण्यात आले या सर्व विभागांची माहिती आलेल्या भाविकांना सेवेकऱ्यांना विनामुल्य दिली. गुरूपौर्णिमे निमित्त सीडबॉल चे पूजन करण्यात आले व 3000 सीडबॉल चे वाटप करुन झाडे जागविण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव तालुक्यातील सर्वच सेवेकऱ्यांनी अनमोल असे सहकार्य केले.