भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील टी.एच.खान कारखान्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या किराणा दुकानातून ३१ हजार ५०४ रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात एकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोहेकॉ वेद हकीम शहा (भुसावळ बाजार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आसिफ खान निसार खान (वय ४४, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) याने टी.एच.खान कारखान्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या किराणा दुकान चालवतो. या दुकानात त्याने महाराष्ट् राज्यात विक्री व बाळगण्यासाठी प्रतिबंधीत असलेले मानवी अपायकारक असलेला असा तंबाखुजन्य सुगंधित पान मसाला (विमल गुटखा) विक्रीसाठी ठेवलेला असतांना मिळुन आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सपकाळे हे करीत आहेत.