मुंबई प्रतिनिधी । कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडले जात आहे.महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना 24 तासांची मुदत दिली होती पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.
कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. यानिमित्ताने कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे. कंगनाने म्हटलं आहे की, “मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे.आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेवा राम मंदिर पुन्हा उभं राहील.