धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील शिवारात तापी नदीचे काठी अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू निर्मित अड्डा आज धरणगाव पोलिसांनी उध्वस्त केला आहे.
नांदेड येथील शिवारात तापी नदीचे काठी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनचे २०० लिटर मापाचे १२ टाक्या रसायने भरलेल्या मिळून आल्याने रसायन पंचांसमक्ष जागीच नाश करण्यात आलेले आहे. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक शंकर शेळके, फौजदार करीम सय्यद, पोलीस नाईक मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदांशिव, प्रवीण पाटील, वैभव बाविस्कर यांनी केली.