मुंबई (वृत्तसंस्था) पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत आपला वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे. मराठी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन आणि पत्रकार बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.
मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस. सामान्य माणसाला आवाज देणाऱ्या प्रबोधनकारांच्या तसेच बाळासाहेबांच्या पत्रकारितेचा वारसा देखील आपल्याकडे आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा धगधगता वसा मराठी पत्रकारितेला मिळाला आहे.