धरणगाव (प्रतिनिधी) महिलेचा प्लॉट घेण्यासाठी माहेरहू तीन लाख आणावे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dharangaon Crime News)
तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील माहेर असलेल्या व मध्य प्रदेशात सासर असलेल्या महिलेचा प्लॉट घेण्यासाठी माहेरहू तीन लाख आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. एवढेच नव्हे तर पतीने तोंडावर मारहाण केल्यामुळे विवाहितेचा दात तुटला. या प्रकरणी सुमैय्या अनवर कुरेश (२४, राणी कमलपती हुजूर, ता. जि भोपाळ, ह. मु. पिंप्री खुर्द) हिच्या फिर्यादीवरून अन्वर हारूण कुरेशी हारूण हुसेन कुरेशी, आरेफा हारूण कुरेशी, शाहरुख हारूण कुरेशी जमिल हारूण कुरेशी यांच्याविरुद्ध भादंवि ४९८ (अ), ३२५, ३५४, ५०४ ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. मोती पवार हे करीत आहेत.
















