जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा शिक्षण संस्था व्दारा संचलित एच. जे. थीम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ करीम सालार होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. करीम सालार म्हणाले की, कठोर परिश्रमा शिवाय यश मिळत नाही.
सदर शिबिर दि. 22 ते 28 मार्च दरम्यान जि.प. उर्दू कन्या शाळा क्रं 1, नशिराबाद येथे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात नशिराबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल मोरे, संस्थेचे खजिनदार अमीन बादलीवाला, मुख्याध्यापक मसउद शेख, आरीफ शेख व उर्दू टाइम्स धुळेचे पत्रकार आबिद हुसैन उपस्थित होते. या 7 दिवसात नशिराबाद येथील कब्रस्तान, झिपरु अण्णा महाराज मंदिर परिसराची साफसफाई, श्रमदान, जनजागृती रैली, पारिवारिक आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले तसेच डॉ अनीस शेख, डॉ चेतन महाजन, डॉ. नयना झोपे, प्रा. सोहेल आमिर, यशवंत शितोळे, डॉ. साहेबराव पडलवार, सैय्यद अल्ताफ अली, डॉ. जयेंद्र लेकुरवाड़े इ. विषयतज्ञाची बौद्धिक व्याख्याने संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व 7 दिवसाच्या कामाचा आढावा रासेयोजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ राजू गवरे यांनी तर सूत्र संचालन अरबीना शेख, जया गायकवाड़ तसेच आभार डॉ अमीन काजी यांनी मानले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. करीम सालार म्हणाले कि, या 7 दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यानी आत्मसात केलेले विविध नैतिक मूल्य व कौशल्य यांचा जीवनाच्या पुढील वाटचालित व्यावहारिक उपयोग करावा. प्रतिभे पेक्षा चारित्र्य महत्वाचे आहे. कठोर परिश्रमा शिवाय यश मिळत नाही. शिबिराच्या यशस्वी ते करीता डॉ राजु गवरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, डॉ तनवीर खान, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, डॉ शबाना खाटीक, महिला कार्यक्रम अधिकारी, डॉ राजेश भामरे, डॉ चाँद खान, डॉ इरफान शेख, डॉ अमीन काजी, डॉ हाफ़िज़ शेख, प्रा. साजिद मलक, डॉ अंजली कुलकर्णी, डॉ फिरदौस शेख, डॉ वकार शेख, डॉ सदाशिव डापके, डॉ अख़्तर शाह, डॉ मुस्तकीम बागवान, डॉ कहेकशा अंजुम, डॉ आयेशा बासित प्रा. उमर पठाण यांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रभारी प्राचार्य प्रा. पिंजारी आय. एम. यांचे मार्गदर्शन लाभले.