नवी दिल्ली (वृत्तसंस्था) युरोपात कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी न मिळाल्याने अनेक प्रवाशांना लस घेतल्यानंतरही क्वारंटाईन राहावे लागत आहे. तर काही देशांमध्ये कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना परवानगीदेखील दिली जात नाहीये. युरोपीयन युनियनमध्ये कोरोना लसीच्या वापरासाठी विकसकांना ईएमएकडे एक अर्ज सादर करावा लागतो. परंतु, कोव्हिशिल्ड लसीसाठी सीरमने आतापर्यंत कोणताच अर्ज सादर केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
युरोपीयन युनियनने गेल्या १५ दिवसांपूर्वी ईयू डिजिटल कोविड प्रमाणपत्र सादर केले होते. ज्यामुळे संपूर्ण युरोपात प्रवास करता येत होते. ईएमएने युरोपात प्रवासासाठी आतापर्यंत चार लसींना परवानगी दिली आहे. ज्यामध्ये फायझर/बायोएनटेक, मॉडर्नाचे स्पाइक वॅक्स, अॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड आणि जॉनसन अँड जॉनसन लसींचा समावेश आहे. युरोपीयन युनियनने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कोव्हिशिल्ड लसीला ग्रीन पाससाठी मंजुरी दिली नव्हती. कोव्हिशिल्डला युरोपीयन देशात लस विकण्याची परवानगी नसल्याचे ईयूने सांगितले होते. युरोपात कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी न मिळाल्याने अनेक प्रवाशांना लस घेतल्यानंतरही क्वारंटाईन राहावे लागत आहे. तर काही देशांमध्ये कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना परवानगीदेखील दिली जात नाहीये. दरम्यान,या मुद्द्याला रेगुलेटर्स आणि डिप्लोमेट्सच्या पातळीवर उपस्थित करीत असल्याने यावर लवकरात लवकर तोडगा निघण्याची आशा वाटते, असे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला गेल्या महिन्यात सांगितले होते.
















